दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई :- राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पडद्यामागे हालचाली सुरुच आहे. फडणवीस यांनी आज अचानक राज ठाकरेंची भेट घेतली आहे.राज ठाकरे यांच्या निवसस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले आहे. या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. परंतू, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील सर्व राजकीय पक्षांच्या डोळ्यासमोर आहे. या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती आणि महाविकासआघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक राज ठाकरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस अचानक राज ठाकेरंना भेटल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. कोणत्याही परिस्थिती राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यातील सर्व 48 मतदारसंघात भाजपने बुथ प्लानिंग सुरू केले आहे.कर्नाटकच्या निकालानंतर राज ठाकरेंनी भाजपला पराभव स्विकारण्याचा आणि आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला होता. तसेच भाजपने चुका सुधाल्या नाहीत तर त्यांचीही गत काँग्रेससारखी होऊ शकते असे देखील राज ठाकरें त्यांच्या भाषणात म्हणाले होते. राज ठाकरेंच्या अशा या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची घेतलेल्या भेटीचा नेमका अर्थ काय याबाबत सध्यातरी तर्कवितर्क लावले जात आहेत.
Tags
सोलापूर