दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई : शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आज दि. ३ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचं निमंत्रण जयंत पाटलांना नव्हत. पुण्यातील साखर संकुलात पाटील आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते.यावेळी शरद पवारांचा फोन आल्यानंतर जयंत पाटील मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, "बैठकीबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. मला बैठकीबद्दल कुणी सांगितलं ही नाही. शरद पवारांनी राजीनामा देणं अयोग्य." असं ते म्हणाले.