अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी ? ; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हातावर घडी तोंडावर बोट

 


तालुक्यातील जनतेचे आरोग्य वाऱ्यावर

दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टर वर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश 

नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे अक्कलकोट तालुक्यातील रुग्णावर उपचार करत आहेत या बोगस व वैद्यकीय व्यवसायचा परवाना नसलेल्या बोगस डॉक्टर मुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच तालुक्यातील बोगस डॉक्टर चा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई ची गरज आहे मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी अक्कलकोट यांच्याकडून कारवाई चे पाऊल उचलले जात नाही  वैद्यकीय परवाना नसलेले अनेक बोगस डॉक्टर अक्कलकोट तालुक्यातील विविध भागात दवाखाने थाटून बेकायदेशीर रित्या वैद्यकीय व्यवसाय करत आहेत ही गंभीर बाब तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती नाही का?  तालुक्यातील गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टर ची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टर ची कमी असल्याने अनेक रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात शिवाय सदरचा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील माहिती नसते  त्याच बरोबर रुग्ण देखील त्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शैक्षणिक पात्रताविषयी अधिक चौकशी करत नाहीत आरोग्य विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होतं नसल्याने  वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर  उघडपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येते अक्कलकोट तालुक्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून अक्कलकोट तालुका बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत नसल्याची माहिती *प्राप्त कागदपत्रानुसार मिळत असून  तालुक्यातील जनतेचं आरोग्य वाऱ्यावर सोडले जात असल्याची चर्चा संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात होत असून या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे


लवकरच  तालुका आरोग्य अधिकारी यांची निलंबनाची मागणी आरोग्य मंत्र्यांकडे करणार - यशवंत पवार

गेले  अनेक महिन्यांपासून अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी तक्रारी व मागणी तसेच पत्रव्यवहार केल्या असून आजतागायत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून अक्कलकोट तालुका आरोग्य अधिकारी इतके निष्काळजी कशे? आहेत म्हणत यशवंत पवार हे आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी यांना निलंबन करण्यात यावे अशी मागणी करणार असल्याचे दैनिक लोकशाही मतदार शी बोलताना सांगितले आहे.


त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश! पण परिस्थिती जैसे थे..

ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टर हे तालुक्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळतात त्या बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी जोर धरून अनेक महिन्यांपासून पुणे विभागीय आयुक्त पासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी पर्यंत तक्रारी व पत्रव्यवहार केले असता , जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे यांनी पवार यांना , शेख सरवदे पटेल अश्या त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांची विशेष समिती नेमून तपास करून कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याचे सांगितले परंतु या गोष्टीला आज जवळपास १५ दिवस उलटून गेले असून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे पवार यांनी दैनिक लोकशाही मतदार शी बोलताना सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form