दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर शहरासह महाराष्ट्रात नागरिक हे लांबलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झाले होते अखेर काल महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बसरला , त्याचप्रमाणे सोलापूर शहर भागात देखील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नागरिकांनी उकाड्यापासून सुटकेचा निःश्वास सोडला मात्र सोलापूर शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना रहदारी करणे एक तारेवरची कसरत झाली होती पहिल्याच पावसात सोलापूर शहराची परिस्थिती अशी झाल्याने सुरू होणाऱ्या पावसाळा कसे निघेल अशी देखील चिंता एकंदरीत सोलापूरकरांना लागली आहे , बऱ्याचश्या
झोपडपट्टी वसाहतीत पाणी शिरल्याने नागरिक संतापले असून, महापालिका काय करत आहे ? नियोजन कधी करणार ? अश्या विविध प्रश्नांनी पहिल्याच पावसामुळे भेडसावले असून , काल बहुतांश ठिकाणी साचलेले पाणी पाहता सोलापूर महानरपालिका ही नेहमीप्रमाणे सगळ्याच बाबतीत जशी सपशेल फेल ठरते तसे यंदा देखील फेल व नियोजन शून्य असल्याचे दिसून आले आहे , असो तरी महापालिकेला नक्की जाग येणार कधी ? आणि महापालिका पावसाळी नियोजन कश्या पद्धतीने करणार हे देखील पाहणं तितकच महत्त्वाचं असणार आहे.
Tags
संपादकीय