दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापूर सह महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून लांबलेल्या मान्सून मुळे जनता बेजार झाली होती , उकाडा वाढल्याने सर्वत्र दिवस घालवणे जिक्रीचे ठरत होते. सोलापूर शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते परंतु आजही पाऊस पडेल की फक्त वातावरण निर्मिती करून पुन्हा उकाडा वाढेल अशी चिंता एकंदरीत सोलापूरकरांना लागून होती , अखेर सोलापूर मध्ये जवळपास संपूर्ण शहर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोलापूरकर सद्ध्या उकाड्यापासून सुटकेचा निःश्वास सोडला आहे .
Tags
सोलापूर