दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापूरच्या या शैक्षणिक चळवळीत विकासाचे ध्येय समोर ठेऊन वीरशैव समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाची स्थापना केली. या अंतर्गत 1993 पासून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या पदवी अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली, सन 2002 मध्ये बटरफ्लाय इंग्लीश मीडियम स्कूल व सन 2009 साली आर्थिक द्रुस्टया दुर्बल तसेच किमान दहावी पास विद्यार्थ्यांच विचार करून महाराष्ट्र व्होकेशनल बोर्ड, मुंबई यांच्या अंतर्गत आर्किटेक्चरशी समकक्ष असणाऱ्या आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन व इंटिरियर डिझाईन आशा सर्टिफिकेट कोर्स ची सुरवात करण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात 2023-24 पासून सोलापूर जिल्हा व विभाग येथे प्रथमच डिप्लोमा इन आर्किटेक्चर या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाची ही सुरुवात करण्यात येत आहे. सादर कोर्स ची प्रवेश मर्यादा 40 इतकी आहे.डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांची मान्यता तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन (MSBTE) यांच्याशी संलग्नीत आहे. किमान दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्सची निवड करताना कोणतीही अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेतली जात नाही.डिप्लोमा कोर्सेसचा कल हा कमी कालावधीत व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक असणारे प्रशिक्षण देऊन विशिष्ट जॉबरोल साठी प्रशिक्षणार्थीना तयार करणे असा असतो. यामध्ये संबंधित विषयातील व्यावसायिक दृष्ट्या गरजेचे असलेले प्राथमिक प्रशिक्षण देऊन कमी कालावधीत प्रशिक्षणार्थीना तयार केले जाते. या कोर्सेस साठी लागणारा कालावधी हा संबंधित विषयातील डिग्री कोर्सेसपेक्षा कमी असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रतासुद्धा कमी आहे.शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी सदरची प्रवेश प्रक्रिया ही डी. टी. ई. मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत असून सदरची प्रवेश नोंदणी सुरू असून कँप राऊंड 3 करिता ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दि. 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023 पर्यन्त उमेदवार डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्ससाठी ऑप्शन फॉर्म भरताना महाविद्यालयाची प्रवेशासाठी निवड करू शकतात. इंस्टीट्यूट कोड 653580110.
सदरच्या अधिक माहितीसाठी https://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा, या संकेतस्थळावरील List of participating Institute या मंथळ्याखाली उपलब्ध महाविद्यालयाची माहिती पहावी.अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे याप्रसंगी एस आर पाटील शरद नायगावकर वैद्यनाथ देवणीकर शंकर पाटील अश्विनी काटगावकर आदी उपस्थित होते.
