भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने 'मोदी हटाओ देश बचाओ' या मागणीसाठी मुंबईत १६ ऑगस्ट रोजी 'बहुजन आक्रोश मोर्चा'

 

दैनिक_लोकशाही_मतदार

मुंबई -  ऐतिहासिक धम्मभूमीचे विकासप्रणेते व भारतीय रक्षक आघाडीचे नेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रक्षक आघाडी महाराष्ट्र वा सामाजिक संघटनेच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात व 'मोदी हटाओ देश बचाओ' या प्रमुख मागणीसाठी येत्या १६ ऑगस्ट २०२३ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे 'ये आजादी झुठी हैं! देश की जनता भुखी है!' या कार्यक्रमांतर्गत बहुजन आक्रोश मोर्चा आयोजित केला असून या मोर्चाचे उद्घाटन छत्रपती शिवरायांचे वंशज व दलित पॅवर महाराष्ट्राचे अध्यक्ष फत्तेसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ई.व्ही.एम. मशिनचे प्रतिकात्मक रितीने दहन करून करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय रक्षक आघाडीचे प्रवक्ते डॉ. कीर्तीपाल गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे यांनी दि. १६ ऑगस्ट १९४७ रोजी आझाद मैदान मुंबई येथे या व्यवस्थेच्या विरोधात स्वातंत्र्यदिनानिमित्त आक्रोश केला होता. या आक्रोशाची पुनरावृत्ती करीत, बहुजनांना वरवाद करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात हा भारतीय रक्षक आघाडीचा मोर्चा होत आहे. आक्रोश मोर्चा एस.सी., एस. टी., एस.टी., ओबीसी, बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि लिंगायत बांधवांच्या हितरक्षणासाठी व त्यांच्या न्याय मागणीसाठी काढण्यात येणार आहे.मोदी सरकारच्या कार्यकाळात खाजगीकरण, आरक्षणावर अल्पसंख्यांक व दलित आदिवासी जनतेवर अन्याय, संविधान बदलण्याची भाषा, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना हिंदू राष्ट्राची निर्मिती, महिलेवर होणारे अन्याय, नग्न धिंड मणीपूरची घटना, पुलवामा हत्याकांड असे विविध प्रश्न मोदी सरकारच्या काळात निर्माण झाले असून हा देश सध्या अशांत व तणावपूर्ण वातावरणात आहे. यादेशातील जनतेस मोदी सरकारने भिकेस लावले आहे. याच्या निषेधार्थ, केंद्र सरकारचा व महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध करण्यासाठी या आक्रोश मोर्चाचे भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी आयोजन केले आहे. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन राज्यातील विविध संघटनेच्यावतीने आपापल्या शहर व जिल्ह्यात मोदी सरकारच्या धोरणाविरूध्द महामहीम ना. दोपदी मुर्मू, राष्ट्रपती भारत सरकार, मा. न्यायमूर्ती चंद्रचूड मुख्य न्यायाधीश सुप्रिम कोर्ट, नवी दिल्ली, मा. निवडणूक आयुक्त, निर्वाचन भवन, नवी दिल्ली यांना देण्यात येणार आहे.या आक्रोश मोर्चात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, दलित पँथरच्या वतीने प्रा. अपरान्त अरुण कांबळे, बुध्दविहार कृती समिती, देहू रोडच्या वतीने अशोक गायकवाड, भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भाऊसाहेब बनसोडे, बिरसामुंडा आदिवासी संघटनेचे राजाभाऊ सरनोबत नागसेन माला, संविधान बचाओ आंदोलनाचे विशाल हिवाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या पत्रकार परिषदेस भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, बिरसामुंडा संघटनेचे राजाभाऊ सरनोबत, धम्मभूमीचे अशोक गायकवाड, पैंथर अपरान्त कांबळे, कुणाल मोरे, सलीम खान हे उपस्थित होते.या मोर्चात एन.टी., ओबीसी, बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख समाजाने भारतीय समाज हितासाठी व राष्ट्रहितासाठी सर्व बहुजन जनतेनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form