दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर शहरात सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे अनेक गरीब सामान्य लोकांना माहिती अधिकाराच्या वतीने शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता सातत्याने प्रयत्न करणारे व तसेच गरीब पीडित वंचित लोकांना आपल्या सामाजिक कार्यातून अनेक ठीक ठिकाणी मदत करणारे श्रीकांत कोळी यांना मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचा पत्र मानव अधिकार संरक्षण संघटनाचे मुख्य संस्थापक व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे.मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ दिलेल्या मानवी हक्कांच्या व्याख्यनेनुसार मानव हक्क म्हणजे व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित असे हक्क जे संविधानाने हमी दिलेले आहेत. आणि अंतरराष्ट्रीय करारामध्ये मृत स्वरुप दिलेले आहेत आणि कायम ठेवलेले आहेत सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार, निष्पक्ष खटल्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षण, धर्माचे पालन स्वातंत्र्य आणि समान हक्क, गुलामगिरी आणि गुलामगिरीपासून मुक्त होण्याचे अधिकार, छळ आणि छळ क्रुरतेपासून मुक्त होण्याचे अधिकार, कायद्यासमारे समानतेचे अधिाकर, कायद्याचे संरक्षण, अनियंत्रित अटक, तुरुंगवास किंवा निर्वासनातून सुटका, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार व अनेक मानव अधिकाराखाली काम करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी व मानव अधिकारचे अनेक शिबिर घेण्यासाठी व मानवाधिकारासाठी या विविध विषयांवर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलने, उपोषणे,निवेदने, पत्र व्यवहार केली जाणार आहे तरी हे कार्य आपण ही चळवळ अशीच पुढे न्यावी व मानवांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा हीच अपेक्षा व्यक्त करत संघटनेने श्रीकांत कोळी यांच्यावर प्रदेश संघटक पद सोपवले आहे.

