दैनिक_लोकशाही_मतदार
भाड्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे महिलांचे गर्भपात करण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी झाल्याचे दि. २२ जुलै २०२३ मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी बार्शी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात काही महिलांचाही समावेश आहे. सुषमा किशोर गायकवाड (नर्स), उमा बाबुराव सरवदे (खासगी दवाखान्यातील मावशी), राहुल थोरात, नंदा गायकवाड, दादा सुर्वे, सोनू भोसले, सुनिता जाधव आणि सोनोग्राफी करणारा डॉक्टर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार गंभीर असून डॉ गोऱ्हे यांनी याची तात्काळ दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी या प्रकरणाचा सुत्रधार कोण आहे तसेच ह्या घटनेचा छडा लागू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झालाय का ? अशा प्रकारे अवैधरित्या गर्भपात च्या सोलापूर तसेच महाराष्ट्रात किती केसेस झाल्या आहेत याबाबत माहिती घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच ज्या सोनोग्राफी मशीन द्वारे गर्भलिंग तपासण्यात आला आहे त्या सोनोग्राफी सेंटर ला परवानगी आहे का ? गर्भाचे लिंग सांगण्यास बंदी असताना डॉ यांनी गर्भाचे लिंग का सांगितले ? ही डॉ यांची कृती कायद्याचा भंग करणारी असल्याने त्यांचे सोनोग्राफी सेंटर तात्काळ सिल करणे आवश्यक आहे. याबरोबरच ज्या ठिकाणी गर्भपात केला आहे ती जागा ही सिल करण्यात यावी व जागा मालक यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
यामधील ७ आरोपीना अटक केली असून तसेच सदरील घटनेतील आरोपीस मदत करणारे त्याचे साथीदार यांचा शोध घेऊन सर्व आरोपींवर आवश्यक कडक कलमे लावावीत. तसेच लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे. हे गंभीर प्रकरण असल्यामुळे सर्व आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी अनुभवी विधीज्ञ देण्यात यावेत.आरोपींना कडक शिक्षा करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे असे निवेदनामध्ये डॉ गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
%20(3).jpeg)
