जेष्ठ पत्रकार डॉ.किर्तीपाल गायकवाड यांची दैनिक लोकशाही मतदार निवासी संपादक पदी नियुक्ती

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - सोलापूर येथील फुले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक , जेष्ठ प्रबुद्ध विचारवंत साहित्यिक व जेष्ठ पत्रकार डॉ. किर्तीपाल गायकवाड यांची दैनिक लोकशाही मतदार च्या निवासी संपादक पदी निवड करण्यात आली आहे.

  डॉ.किर्तीपाल गायकवाड हे गेल्या ४ दशकांपासून आंबेडकरी चळवळीत कार्य करीत आहेत लेखक अभिनेते दिग्दर्शक प्रकाशक संपादक संशोधक समिक्षक नाटककार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत डॉ. किर्तीपाल गायकवाड यांच्या पत्रकारितेची सुरवात १९८५ पासून साप्ताहिक बंडखोरच्या सहसंपादक पदाने झाली असून १९९३ पासून दैनिक संचार मध्ये उपसंपादक पदावर त्यांची नेमणूक झाली तदनंतर दैनिक विश्वसमाचार दैनिक पुढारी व दैनिक सुराज्य मध्ये जेष्ठ उपसंपादक पदी त्यांनी कामकाज पाहिले १०० आठवडे अभियान हे सदर त्यांनी चालविले विविध वृत्तपत्रातून प्रासंगिक लेखन संपादकीय लेखन वृत्त विशेष मुलाखती व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष वृत्त त्यांच्या नावाने प्रकाशित झाले आहेत गेल्या ३५ वर्षापासून ते वृत्तपत्र सृष्टीत काम करत आहेत फुले आंबेडकरी विचारांचे जाणकार अभ्यासक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक पत्रकारितेचा वारसा जोपासून प्रबोधनात्मक लिखाण करतात. आता नव्याने सुरू झालेल्या आमच्या दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राच्या निवासी संपादक पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकून एक जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार म्हणून त्यांची दैनिक लोकशाही मतदार च्या निवासी संपादक म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड साप्ताहिक बंडखोरचे जेष्ठ संपादक अंबादास शिंदे जेष्ठ साहित्यिक कुष्ठरोग तज्ञ यू एफ जानराव दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या हस्ते ओळखपत्र पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form