दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर | प्रतिनिधी - अतंराली - सराटी ( जालना ) येथील आंदोलन कर्त्यांनी बेशुमार दगडफेक केल्यामुळे तेथील बंदोबस्तात. असलेल्या अनेक पोलीस / कर्मचाऱ्यावर व पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. काहींचे पाय तुटले / हात तुटले आहे तर काहींचे डोके फुटले, तर काहीजण मरण पावण्याच्या स्थितीत आहेत. म्हणून ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी, आमच्या संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून ५ /१० लाखांची चांगली अशी मदत मिळावी. आणि निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब सेवेत रुजू करून घ्यावे नाही तर आमच्या संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील ....
तसेच सध्या सोलापूर शहरात २ नंबर धंद्याने धुमाकूळ घातला आहे.
राजरोसपणे. मटका, गुटखा, मावा, जुगार, गांजा, बेकायदेशीर डान्स बार, अशा अनेक २ नंबर धंद्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा व त्यांच्या वरच्या अधिकार्यांचा पाठिंबा आहे असल्यामुळे सोलापूर शहरातील २ नंबर धंद्यांने डोके वर काढले आहे....
आणि एवढेच क्या तर सोलापुरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अभय देण्याचे काम करत आहेत....
उदा, ज्यांच्या वर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत २०/२० - ३०/३० गुन्हे असताना त्यांच्या वर कारवाई केली जात नाही, विशेष म्हणजे काही लोकांवर ॲट्रॉसिटी चे गुन्हे असून सुद्धा त्यांना अटक नाही, २ नंबर धंदे वाल्यांनवर कारवाई नाही.
म्हणून जो पर्यंत अशा लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू ठेवणार आहे तरी . १८/०९/२०२३. पासून जिल्हा परिषद पुनम गेट येथे मी माझ्या संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केल्याचे डी डी पांढरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
