दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सदाशिव देठे निवासी प्रशाला व कॉलेजचा डंका! माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (सोलापूर) येथील शाळा खेळात सुद्धा दर्जेदार कामगिरी बजावत आहे.
गौतम सुरेश शिंदे या 19 वर्षाच्या विद्यार्थाने 86 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विजयी झाला.समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चलाखीने चितपट करून अखेर डाव जिंकला. प्रशालेच्या सदर विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.19 वयोगटात 61 किलो वजनगटात श्रीरंग नाना वळकुंडे या विद्यार्थ्यांने फ्री स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चा विद्यार्थी गौतम सुरेश शिंदे (अकरावी) याचा विशेष सत्कार संस्थापक डॉ. कुमार लोंढे,मल्ल सम्राट वस्ताद अस्लम काझी ,जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव साहेब यांनी मानचिन्ह देऊन सत्कार केलाया यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य कुंडीलक साठे,शाळा समिती,क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केले.विशेष परिश्रम प्रा.कुंडलिक साठे यांनी घेतले
