दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर शहर व जिल्यामध्ये चालु असलेल्या बिअरबार, परमिटरुम व ऑर्केस्ट्रा वारच्या अनागोंदी कारभाराबाबत कारवाई न झाल्याने लोकशाही मार्गाने अंदोलन करणार
सोलापूर- सोलापूर शहर व जिल्हयामध्ये हॉटल जय मल्हार, हॉटेल पुष्पक, हॉटेल कलवेरी, हॉटेल आम्रपाली, हॉटेल विजयराज, हॉटेल वरगुडा, हॉटेल गुत्तेदार, हॉटेल विनय, औराद येथील हॉटेल राजश्री, हॉटेल सागर अशा विविध हॉटेलमध्ये मनमानी प्रमाणे चढ्या दराने मद्याची विक्री करुन, ग्राहकांची खुलेआम लुट केली जात आहे, अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये मद्य विक्रीचे परमिट धारक असून त्यांच्याकडून आलेल्या व गेलेल्या मालाचे आवक जावक रजिष्टर व परमिट धारकांकडून, किती ग्राहकांना मद्य प्राशन केले याचा हिशोब, त्यांचे परमिट रुम ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली रात्रभर डान्स चालु ठेवून तेथे अर्धनग्न कपडयावर मुलींकडून डांन्स करुन घेतला जातो. त्यांना अश्लिल हावभाव करण्यास जबरदस्तीने भाग पाडले जाते. कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील मुलींना कंपनीमध्ये काम लावण्याच्या अमिष दाखवून मुलींना जादा रक्कमेचे अमिष दाखवून असे बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडले जाते. असा आरोप युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केले आहे पुढे बोलताना म्हणाले की..सदर ऑर्केष्ट्राबारची वेळ किती आहे ? ते किती वेळ चालु ठेवावीत ? या संबंधाने अशा ऑर्केस्ट्रारबार वर कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. विशेष बाब म्हणजे ऑर्केस्ट्रा चालकांना केवळ मनोरंजन करण्याची परवानगी असताना तेथे अनाधिकृत मद्याची देखील विक्री केली जाते या विषयान्वये मा. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सोलापूर, पोलीस अधिक्षक सोलापूर (ग्रामीण) व राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांचे कार्यालयात दिनांक २८/८/२०२३ रोजी रितसर तक्रारी अर्ज करुन कारवाई करणेबाबत कळविलेले होते. परंतू संबंधीत कार्यालयाने आजतागायत कोणत्याही प्रकारे कारवाई न केल्याने दिनांक ०३/१०/२०२३ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर व पोलीस अधिक्षक सोलापूर (ग्रामीण) येथे सकाळी ११ ते २ यावेळेत लोकशाही मार्गाने ऑर्केस्ट्रा आंदोलन करण्यात येईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधीत कार्यालय, जबाबदार राहील असा ईशारा महेश डोलारे यांनी दिला आहे. आता डान्सबार ऑर्केस्ट्रा बार बंद होण्यासाठी एक अनोखे असे ऑर्केस्ट्रा आंदोलन होणार असून पोलिस प्रशासन आता याकडे कसे पाहणार आणि पोलिस प्रशासनाने अश्या छमछम बार बाबत काय भूमिका असणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
