राम हुंडारे यांच्या घरातील पाच दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन... 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकरच या,

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) :- 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकरच या, अशा जयघोषात सोलापूरकरांनी पाच दिवसांच्या बाप्पांना शनिवारी निरोप दिला.पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या घरातील गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती करण्यात येत होती, आरतीच्या वेळी घरातील गीता हुंडारे, सायली, सलोनी, सागर तसेच सोसायटी मधील लहान मुले आरतीच्या वेळी उपस्थित रहात होती.
 विसर्जनाच्या पाचव्या दिवशी बँक ऑफ़ महाराष्ट्र मध्ये सीनिअर कॅशियर पदावर कार्यरत असलेले राजू डांबरे व योग शिक्षिका तथा भजनी मंडळाच्या उपाध्यक्षा शीतल डांबरे यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. आरती झाल्यानंतर लहान मुलांना प्रसाद वाटप करण्यात आले.राम हुंडारे यांच्या घरातील गणेशोत्सव पाच दिवसाचा असल्याने शनिवारी संध्याकाळी गणेशाचे छत्रपती संभाजी तलाव येथे उत्साहात विसर्जन करण्यात आले.सायंकाळपर्यंत अनेक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी सोलापूर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती संभाजी तलाव (कंबर तलाव) येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. अशा आनंददायी वातावरणात सोलापूरकरांनी गणपतींना शनिवारी निरोप दिला.बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी सोलापूर पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले होते, दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form