जरांगे पाटलांच्या सभेला 30 ते 35 हजार मराठा समाज बांधव सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित राहणार.....! समन्वयक माऊली पवार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सकल मराठा समाजाचे सोलापूर शहर  आणि जिल्हातून मराठा संघर्ष योध्दा  मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटी ता. आंबड जिल्हा जालना येथील मराठा आरक्षण परिषदेला  संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातून उस्फूर्तपणे  ३० ते ३५  हजार मराठा बांधव  आरक्षण परिषदेला हजर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी  जवळ जवळ ३ हजार गाड्या निघणार असून  कांहीं मराठा तरुण दुचाकी आणि इतर वाहतुकीच्या साधनांनी आंतरवळी  सराटीला सभेस हजर राहणार आहेत.अशाप्रकारे जिल्ह्यातून  जवळ जवळ ३० ते ३५ हजार मराठा बांधव आरक्षण परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
   प्रत्येक मराठा तरुण आता पेटून उठला असून जर जरांगे पाटील हे प्रकुर्ती साथ देत नसताना सुध्दा , दररोज सलाईन लावून उपचार घेत असताना सुध्दा दररोज पहाटे ३ वाजेपर्यंत सभा घेऊन, मराठा बांधवांना सभेला येण्याचे आवाहन करतात. त्याला प्रतिसाद म्हणून लाखो मराठे सभास्थळी जमा होणार आहेत . या माध्यमातून सरकारला मराठा समाजाची  ताकद दिसणार आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न जर नाही सोडवला तर महाराष्ट्रातील ३५टक्के मराठा राजकारण्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. आता नाही तर पुन्हा कधी ही आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजाला कळाले आहे त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठे सभेला उपस्थित राहणार आहेत....!

विशेष सूचना :- सर्व मराठा बांधवांना नम्र आवाहन की, आपण आपल्या गाड्यापार्किंग हे आपल्या जिल्ह्यासाठी  दिलेले आहेत. त्याच जागी गाड्या पार्क कराव्यात....!
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form