महाराष्ट्रराज्य आरोग्य निरीक्षक संघटनेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्याकडे सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना शाखा सोलापूरच्या वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी पालकमंत्र्यांना मागण्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून देऊन मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आशा व्यक्त केली याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

"या" आहेत मागण्या -

१ ) सोलापूर महानगरपालिकेतील ४ आरोग्य निरीक्षक गेल्या २० ते २५ वर्षांपासून रोजंदारी वरती काम पाहत आहेत त्यांना कायम नियुक्तीचे आदेश व्हावेत.

२) सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी यांना जाचक असलेले अटी व वाय टैग, गुगल कैलेंडर, मासिक अहवाल, टाईम्स स्टॅम्प असे कामकाज बंद करण्याचे आदेश व्हावेत.

३) सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगातील १ जानेवारी २१ ते ३१ डिसेंबर २१ एकच वर्षांचा फरक अदा करण्याचे आदेश व्हावेत.

४) सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांस राज्य शासनाचे नियमाप्रमाणे आरोग्य निरीक्षकास वेतन देण्याचे आदेश व्हावेत.

५) सोलापूर महानगरपालिकेतील गेली २५ वर्षापासून सेवा करन बदली सेवक सन २००८ ते २०११ आणि आजतागायत सेवानिवृत्त गाणे अशा कर्मचान्यांना सेवानिवृत्ती उपदान (निवृत्ती वेतन ) अदा करण्याचे आदेश व्हावेत

६) सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांना नाहक झालेला दंड माफ करून सेवा पुस्तकात झालेल्या नांदी रद्द करण्याचे आदेश व्हावेत 

७) सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचान्यांना घरकुल योजनेअंतर्गत मनपाच्या जागेवरती घरकुल बांधुन देण्याचे आदेश व्हावेत.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form