दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार मानले जाते आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला. महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांत महात्मा गांधी यांचे स्मरण केले जाते, त्यांना अभिवादन केले जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. सत्याग्रहासारखे अस्त्र दिले. जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवला. सत्य आणि अहिंसेचे व्रत आयुष्यभर जपणाऱ्या महात्मा गांधी यांचे विचार खूपच प्रेरणादायक आहेत. अशी भावना लिंबारे यांनी व्यक्त करत
सोलापुरातील मंद्रूप तहसीलदार कार्यालय येथे तहसिलदार राजशेखर लिंबारे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी तहसिलदार कार्यालयातील इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

