दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - गाव तसं चांगल पण वेशीला टांगलं अशी मराठी मध्ये म्हण आहे सोलापूर शहर अनेक जाती धर्मा मध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे या शहरात अनेक यात्रा जत्रा सणं उत्सव मिरवणुका मोठया प्रमाणात असतात उत्सवप्रिय शहर म्हणून आगळी वेगळी ओळख एकेकाळी सोलापूर मध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जानकार वृद्ध मंडळी सांगतात जुन्या जमान्यात सोलापूर मध्ये नरसिंग गिरजी मिल जाम मिल या सह इतर काही मिल होत्या त्यातून कापड निर्माण होत असे चाटी गल्ली सराफ बाजार सारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते कालांतराने सोलापूर मधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नस्ट पावले मिल बंद पडल्या अन कामगार देशोधडीला लागले बेरोजगारी वाढली कमावणार एक अन खाणार चार अशी अवस्था सुरु झाली यात राजकारण आल्याने सोलापूर चा विकास ऐवजी भकास झाला
सावकारांची वाढती संख्या अन जनतेची लूट
सोलापूर शहरात सावकरी परवाना व नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेचं कमी दराने व्याज बट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात ते कसे हे वेगळं सांगायची गरज नाही
वीस ते पंचवीस हजार मोजा अन घेऊन जा सावकारी परवाना
वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात परंतु नियम करणारेच नियम पायदळी तुडवतात लक्षमी चे दर्शन झाले की कसले नियम व कुठला कायदा ठराविक रक्कम मिळाला परवाना
अस्मानी सुलतानी व्याजाने कंबरडे मोडले
सोलापूर शहरात परवाना असलेले व परवाना नसलेले अनेक सावकार असून पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पर्यंत हे सावकार समोरच्या व्यक्ती ची गरज पाहून व्याज आकारतात त्यासाठी कोरे चेक बॉण्ड घेतात वेळ प्रसंगी मारामाऱ्या शिवीगाळ देखील भरमसाठ व्याज घेतल्याने अनेक सावकार मालामाल झाले असून व्याजाने पैसे घेणारा मात्र कंगाल झाला आहे याच सावकारी म्हणून शहरातील अनेक लोक भिकेला लागले आहेत
सावकारीला आळा घालण्यात उपनिबंधक अपयशी ठरले
सोलापूर शहरात व्याज बट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठया प्रमाणात सुरु असून अनेक सावकार शेत जमीन घरजागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो सावकारच्या या कृती ला पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे आधीकार शहरउपनिबंधक कार्यालयाला असून आता हेच उपनिबंधक कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसत आहे

%20(7).jpeg)