पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन शिबिरासाठी सोलापूर विद्यापीठाच्या दोन विद्यार्थिनींची निवड!

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील दोन विद्यार्थिनींची आंध्र प्रदेश मध्ये होणाऱ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थिनींचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.सुकेशनी औदूंबर गव्हाणे (के.बी.पी. महाविद्यालय, पंढरपूर) आणि रिया दशरथसिंग परदेशी (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा) या विद्यार्थिनींची राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचालन पश्चिम विभागीय शिबिरासाठी निवड झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये दि. 27 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन निवड चाचणी शिबीरामध्ये 6 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यातून दोन विद्यार्थिनींची निवड झाली. आता पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर के. एल. युनिव्हर्सिटी मंगलगिरी, विजयवाडा आंध्र प्रदेश येथे दि. 1 ते 10  नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. यासाठी विद्यार्थिनी रवाना झाल्या आहेत. 
शिबिरासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा विद्यापीठ प्रशासनाकडून कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, संघ व्यवस्थापक संजय मुजमुले आदी उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form