स्वतंत्र ग्रामपंचायत व गावच्या विकासासाठी अखेर गावकऱ्यांचा पुढाकार ; सर्वच गोष्टींनी गाव उपेक्षित असल्याचे ग्रामस्थांचा टाहो


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - मौजे- तरटगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील हे गाव केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांनी आदीवासी गाव म्हणून घोषित झालेले आहे. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे आदिवासी गाव घोषीत झाले असता, गावचा सर्वांगीण विकास होणेसाठी तसेच राहत असलेले सर्व ग्रामस्थ लोकांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होणेसाठी गावची स्वतंत्र ग्रामपंचायत होणे अतिशय गरजेचे गावची सन २०११ च्या जन-गणनेनुसार ५०७ इतकी लोकसंख्या असून आजतागायत पर्यंत लोकसंख्ये नुसार सर्वच यंत्रणा गावाचा विकास करण्यासाठी आपुरी पडत आहे. तरी ग्रामस्थांची विशिष्ट जमातीची बाब लक्षात घेवून केंद्र शासन व महाराष्ट्र शासन, आदिवासी विभाग विकास करणेसाठी ग्रामपंचायत कार्यालय पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु सद्यस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय हे मौजे शिंगोली येथे असून, आमचे सर्व आदिवासी पाड्या पासून व वस्त्यापासून खूप दूर असले कारणाने तसेच सोलापूर- कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ हा दोन गावाच्या मधून गेले असलेमुळे उड्डाण फुलाचे फार मोठे दुभाजक तयार झालेले असून. प्राथमिक गरजासाठी खूप दूर जाऊन प्रत्येक गोष्टीसाठी तासंतास पायपीट करत जावे लागते. तरी गांवात आजवर कोणतेही पिण्याच्या पाण्याची व वापरायच्या पाण्याची सोय स्वतंत्र नसल्यामुळे मौजे शिंगोली येथे असणारे गावातून आजवर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तरी आजपर्यंत गावचा कोणताही ठोस विकास व विकास कामे झालेली नाहीत. गावामध्ये अतिशय दुर्गंधी व रोगराई कायम वास्तव्यास असते. गांवामध्ये कचरा, सांडपाणी, बाहेर न जाता, गेली ५० ते ६० वर्षे गावातच जिरत असून, गावातील सर्व हात पंपाना अशुध्द पाणी असून, हा एक प्रकारचा आदिवासी जमातीवर केलेला अन्याय असून, वाढलेल्या लोकसंख्या विचारात घेता, ग्राम पंचायत स्वतंत्र करून व्हावी. तरी लागणारे सर्व कागदपत्राची पुर्तता आम्ही करीत विनंती अर्जाचा आपण योग्य तो सहानुभूतीपूर्वक विचार करून एक आदिवासीसाठी विशेष बाब म्हणून विचारात घ्यावी. व स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी आम्हां ग्रामस्थांची मागणी असून शासन स्तरावर तसेच मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांना विनंती अर्ज व निवेदन देण्यात आले. या प्रसंगी - इंजी. सोमनाथ दावणे , काका वाघमारे , पांडुरंग रासेरव, सागर मोटे , महादेव भद्रशेट्टी, प्रदीप पाटील , बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form