येथे झाले अनोखे अभिवादन; होतोय सर्वत्र "या" उपक्रमाचा कौतुक ; पहा काय आहे उपक्रम


डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चांदापुरी येथे अठरा तास अभ्यास करून मानवंदना....!

दैनिक_लोकशाही_मतदार

माळशिरस :- माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे महाराष्ट्र शासन बार्टी,समाज कल्याण सोलापूर व सोशल संस्था यांच्या विद्यमाने डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज या ठिकाणी संपन्न झाले.अठरा तास अभ्यास करून शंभर विद्यार्थांनी डॉ.आंबेडकरांना मानवंदना दिली सुरुवातीस संस्थापक डॉ.कुमार लोंढे,माजी सरपंच भजनदास चोरमले,चांदापुरी चे सरपंच जयवंत सुळ,तरंगफळ चे सरपंच नारायण तरंगे,गारवाड चे सरपंच सुभाष साठे, प्राचार्य कुंडलिक साठे,समतादूत किरण वाघमारे, लेबर अलाईन्स फोरम चे जिल्हा अध्यक्ष रणजित सातपुते,शाळा समिती चे जितेंद्र देठे,अरुण बोडरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 या अभियानात सदाशिव निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी,अकलूज,जत,तरंगफल ,पिलीव या भागातील 100 मुले व मुलींनी सहभाग नोंदवला.या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाइंजे म्हणाले या शाळेचा जर त्या वर्षी 100 % निकाल असतो,खेळामध्ये राज्यस्तरावर कॉलेजचे विद्यार्थी बाजी मारत आहेत.विद्यार्थ्यांनी आयुष्यात खचून न जाता पुढे जावे.माळशिरस कोर्टाचे राजाभाऊ वाघमोडे म्हणाले तुम्ही अठरा तास अभ्यास करत आहात हीच खरी आंबेडकरांना आदरांजली आहे.भजनदास चोरमले म्हणाले शिक्षणामुळे दृष्टी मिळते मी या शाळेसाठी नक्कीच मदत करेन डॉ. कुमार लोंढे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे  ते असे नवनवीन उपक्रम घेत असतात असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले

यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,स्पर्धा परीक्षा,संत तुकाराम व विविध प्रकारची पुस्तके वाचली सर्व जाती धर्माची मुले या अभियानात सहभागी झाली होती

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ऍड धनंजय बाबर,संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सरक,सरतापे ,रिपाई चे अण्णा भोसले, शशी साळवे ,आबा साळवे,सुजित तरंगे,युवराज नरुटे,गौरीहर बोडरे,दिनेश गाडे,समाधान खरात इ नी अभियानास भेट देऊन  शिक्षक ,संस्थापक व शाळेचे कौतुक केले.सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोहार,जेवण व फळे देण्यात आली

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.अल्ताफ पठाण,प्रा राजेश वायदंडे,श्रद्धा काळे मॅडम,अरुणा लोंढे मॅडम,प्रा.कारंडे,प्रा.देवकाते,प्रा.नितीन सरक,अंकुश लोंढे,विद्यार्थी समाधान ढावळकर,गणेश शेटे,सुर्यप्रताप कांबळे,ऐश्वर्या देठे,चंदना मगर,अक्षता देठे इ नी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form