दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर :- मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गुरनं ६२६/२०२३, भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी बाळू सुरवसे हे त्यांची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MH-१३ CZ- ८९२० ही घरासमोर लावून घरात झोपले असता अज्ञात चोरट्याने सदरची मोटार सायकल ही चोरून नेलेबाबत गुन्हा दाखल होता.स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नागनाथ खुणे यांचे पथक हे दिनांक १४.१२.२०२३ रोजी मंगळवेढा पोलीस ठाणेच्या हद्दीत मालाविषयी गुन्ह्यांच्या संदर्भाने आरोपींचा शोध घेत असताना फिर्यादी बाळू सुरवसे यांची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MH- १३ CZ- ८९२० ही मंगळवेढा शहरातील एका इसमाने चोरली असून तो बस स्थानक परीसरातील हॉटेलजवळ थांबला असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यावरून सपोनि खुणे यांच्या पथाकाने सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले. सदर इसमाकडे विश्वासात घेवून तपास करता त्याने अशा प्रकारच्या आणखी ५ मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे कबूल केले, तसेच चोरी केलेल्या मोटार सायकल या त्याच्या राहते घराच्या मागील बाजूस असणारे पत्रा शेडमध्ये लपवून ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरून सदरच्या आणखी ५ ही मोटार सायकल या जप्त केले आहेत. सदर मोटार सायकलचे आर.टी.ओ. क्रमांक मोटार सायकल वरून काढून टाकण्यात आले आहेतयातील अ.क्र ३ ते ६ मोटार सायकलचे आर.टी.ओ. रजिष्ट्रेशन क्रमांक हे आरोपींनी काढून टाकून दिले असल्याने मोटार सायकलच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे. तरी याद्वारे मंगळवेढा शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरील वर्णनाच्या मोटार सायकल ज्यांच्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण (मोबाईल क्रमांक ८०८२५९०१९०) येथे संपर्क करावा.वातील अटक करण्यात आरोपी याचेविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७५६/२०२३, भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ खुणे, सहायक पोलीस निरीक्षक, यांचेसह सहा. फौ. शिवाजी घोळवे, श्रीकांत गायकवाड, पोह रवि माने, पोह, पोकों अजय वाघमारे, सुरज रामगुडे, अन्वर आत्तार सह आदींनी केली आहे
Tags
सोलापूर जिल्हा