काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांचा सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
पंढरपूर (प्रतिनिधी)-पत्रकार सुरक्षा समिती चे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांचा काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ सुरेंद्र काणे आणि डॉ वर्षा काणे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. 
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,चैतन्य उत्पात, विश्वास पाटील, अमर कांबळे, रवी शेवडे, कबीर देवकुळे आदी पत्रकार उपस्थित होते. 
यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे म्हणाले, आता मोठी जबाबदारी आली असून संपूर्ण राज्यातील पत्रकारांचे प्रश्न, अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने शहरात समाजोपयोगी उपक्रम सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात येतील.
 संस्थापक यशवंत पवार यांनी जो विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही रामचंद्र सरवदे यांनी दिली. 
तसेच पंढरपूर येथील सुप्रसिध्द डॉ मेनकुदळे यांनीदेखील रामचंद्र सरवदे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form