दैनिक_लोकशाही_मतदार
धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे नळदुर्ग ते अक्कलकोट रोड बि.के फंक्शन हॉलच्या शेजारी व परिसरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या बिनधास्तपणे शासनाची कुठलीही रॉयल्टी न भरता मुरूम उपसा रात्रंदिवस सुरू आहे. त्या ठिकाणी काही शासकीय अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून राजेरोसपणे शासनाचा महसूल( रॉयल्टी ) बुडवण्याचे काम सुरू आहे
माती व मुरूम रात्रंदिवस उचलण्यात येत आहे नळदुर्ग हद्दीतील मुरमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे गोणखणीज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे महसूल विभाग कारवाई करत नसल्याने या मागचे गोळबंगाल दिसून येत आहे तुळजापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सदरील ठिकाणी पंचनामे करून अवैधरीत्या गोणखणीजावर नियंत्रण करावे तलाठी, मंडळ अधिकारी, प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. गोणखणीच्या वर लक्ष ठेवणे हे तलाठ्याचे आद्य कर्तव्य आहे. गोणखनिज बाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठी यांनी केले पाहिजे व असेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गोणखणीजाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुद्दतीत उत्खन झाली पाहिजे परंतु सध्याच्या स्थितीत अशा काहीही परिस्थितीत त्या ठिकाणी दिसत नाही यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व अनेक शासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांनी आदेश पारित करावे व त्या ठिकाणी अवैधरित्यामुळे उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा. म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी तुळजापूरचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली आहे.
यापुढे अशाच प्रकारे नळदुर्गच्या अवैधरित्या मरूम उपसा प्रकरणी धाराशिव चे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा सुरूच राहणार अशी गवाही सादिक शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
