दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर :-जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्कमध्ये घरासमोरील रिकाम्या जागेत ठेवण्यात आलेले मंडपाचे साहित्य काढण्याच्या कारणावरून जातीचा उल्लेख करीत तलवार, दगडाने जबर मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडू धायगुडे, मानव धायगुडे, यश मोटे, ओंकार मोटे, शेटे व अन्य सहाजण (सर्व रा. बॉम्बे पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.बाळकृष्ण सदाफुले यांनी सोसायटीच्या रिकाम्या जागेत मंडपाचे साहित्य ठेवले होते. हे साहित्य काढण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झालेल्या लोकांनी मिळून जातीचा उल्लेख करत दगडाने, विटाने अन् तलवारीने मारहाण केली. मारहाणीत बाळकृष्ण सदाफुले, युगंधर सदाफुले व लहान भाऊ, असे तिघे जण जखमी झाले. युगंधर सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकरा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, तपास सहायक पोलिस आयुक्त परमार करीत आहेत. सोलापुरातील अश्या घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक आणि दबदबा कमी झालाय की काय ? असा प्रश्न सध्या सोलापूरकरांना भेडसावत आहे अश्या घटनांकडे पोलिस आयुक्त कश्याप्रकारे पाहणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान पीडित बाळकृष्ण सदाफुले हे जीवघेणा हल्ला झाले आहे तसेच जातीवाचक शिवीगाळ देखील झाले आहे त्यामुळे इतका गंभीर जीवघेणा हल्ला माझ्या व माझ्या मुलावर झाले असून ३०७ या कलम वाढीची मागणी करणार असल्याचे दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले आहे
