वांबोरी-निंबळक येथे जलदगतीची चाचणी ; रेल्वे विभागाचे नागरिकांना आवाहन



दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - सोलापूर विभागातील वांबोरी-निंबळक येथे नवीन रेल्वे लोहमार्गाची जलदगतीची चाचणी दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे . तसेच या नवीन लोहमार्गाची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून होणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या रोजच्या सवयी पासून दक्षता घेत, या रेल्वे मार्गापासून दूर राहावे. तसेच आपली पाळीव गुरे, पाळीव प्राणी या नव्या रेल्वे मार्गावर येणार नाहीत याची काटेकोरपणाने काळजी घ्यावी.तसेच लोहमार्गावर कोणीही वावरू नये असे जाहीर आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form