अन्न व औषध प्रशासनाची सुगंधित तंबाखूविरुद्धची मोठी कारवाई बडे गुटखा माफिया मात्र मोकाट.त्यांच्यावर कारवाई कधी?


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर-येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा,मावा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत मोठा छापा टाकलाय. उत्तर कसब्यातील या धाडीत हजारोंचा प्रतिबंधीत माल हस्तगत करण्यात आलाय. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी, १८ मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छाप्यात उत्तर कसब्यातील के एस पान टपरी मधून २२ डब्बे बाबा सुगंधित तंबाखु, १.५ डब्बा रजनीगंधा पानमसाला, ४१ पाकीटे हिरवा गोवा, २४ पाकिटे व्हि १ सुगंधित तंबाखू, २४ पाकिटे विमल पानमसाला, ०२, पाकिटे हाय गुटखा, १ बॉक्स एम सुगंधित तंबाखू असा ४९,९६५ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील (अन्न व औषध प्रशासन म. राज्य, सोलापूर प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे (वय ४२ वर्षे, रा. उंबरजकर वस्ती, निराळे वस्ती जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुरनं १६३/२०२४ .भादवि १८८,२७२,२७३,३२८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २६(२) (i),२६(२) (ii), २६(२) (iv), २७ (३) (E),३० (२) (A),५९ प्रमाणे गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे सपोनि पाटील यांच्याकडं देण्यात आलाय.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form