समाज कल्याण अधिकारी खमितकर यांच्या विभागीय चौकशी चा प्रस्ताव

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी )-आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याच्या खात्यामध्ये दोनदा पैसे पाठवणे अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेच्या निधी वितरणातील गोंधळ वृद्ध कलावंत मानधन समितीची रखडलेली नियुक्तीसह समाज कल्याण विभागातील कार्यपद्धतीच्या तक्रारीमुळे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

तीन महिन्यापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याच्या बँक खात्यामध्ये दोनदा पैसे पाठवण्यात आले होते तो प्रकार उघडकीस आल्यावर बँकेकडून चूक झाल्या चे कारण पुढे करण्यात आले त्या प्रकरणाची स्वतंत्र समिती तर्फे चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी दिले होते. पंधरा दिवसापूर्वी शीरभावी (सांगोला ) येथील सरपंचाच्या नातेवाईकाने अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेचा निधी मिळाला नसल्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांची खातेप्रामुख सोबत वादावादी झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form