दैनिक_लोकशाही_मतदार
पुणे | प्रतिनिधी (सचिन सोनवले)- लष्कराच्या सदन कमांड येथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करणाऱ्या व पूर्वी लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैसे घेऊन बनावट अपॉयमेन्ट लेटर घेऊन फसवणूक करणाऱ्या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंडवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुलींना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून लष्करात सिव्हिलियन या पदावर नोकरीला लावतो म्हणून ८,३२,०००रू घेऊन नोकरी न लावता फसवणूक केली होती. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गु.र.न११८९/२०२४, भा.दं.वि.कलम.४०६,४२०,४६४(अ),४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत कोंढवा तपास पथकातील श्री. लेखाजी शिंदे सहा पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना दि.०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील श्री लेखाजी शिंदे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार विकास मरगळे, शशांक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन. आय. बी. एम. रोड साळुंखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे ओळख लपवुन तोंडाला रुमाल बांधून सामान घेण्यासाठी आला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकातील स्टाफसह एन. आय. बी. एम. रोड साळुंखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर जवळ गेलो तेव्हा गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातून सामान खरेदी करून निघून चालला होता. त्याच्याकडे बातमीदाराने बोट करून सुचवले असता त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाबूलाल परदेशी राहणार कृष्ण केवल सोसायटी, एन, आय, बी, एम, रोड कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे दाखल गुन्हयांच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेऊन नोकरीची आमिष दाखवून फसवले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असून त्याबाबत अधिक तपास वैभव सोनवणे सहा पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
वरील प्रमाणे कामगिरी मा. अमितेश कुमार साहेब पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साहेब, अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साहेब परि.५, मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो. नि. पो.हवा. अमोल हिरवे, पो.हवा. राहुल वंजारी, पो. शि. अभिजीत रत्नपारखी, पो. शि. शशांक खाडे, पो. शि. विकास मरगळे, पो.शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे. पो. शि. जयदेव भोसले, पो.शि. अभिजीत जाधव, पो.शि. आशिष गरुड,पो.शि. रोहित पाटील, पो.शि. अक्षय शेंडगे यांनी केली आहे.
