राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३३व्या जयंतीनिमित्त अभिवादन.

सोलापूर(प्रतिनिधी) :- सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३३ व्या जयंतीचे औचित्य साधून पार्क चौक अर्थात आंबेडकर चौकातील त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी बुद्ध वंदना घेऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रांजली मोहीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे आपण अनुकरण करावे असे प्रास्ताविकेत मत मांडले. या कार्यक्रमास माजी सैनिक दिवाकर रेळेकर,माजी पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे,सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे बीएस फाउंडेशनचे अध्यक्ष अन्सर तांबोळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि कार्यकारणी सदस्य यांनी सर्वांनी मिळून "हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे" ही माणुसकीवर आधारित प्रार्थना गायन केले .दिवाकर रेळेकर, अनिल उकरंडे,विजय नागमोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. गायक तथा पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे आणि शैलेश मोहीकर यांनी भीम गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व उपस्थितांना मिठाई वाटून अभिवादनाच्या कार्यक्रमाचा आनंद देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी , तर आभार प्रदर्शन अरुण धुमाळ यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रांजली मोहीकर,शैलेश मोहीकर,वेदांत मोहिकर,प्रेमचंद मेने,सौ.ज्योती मेने,अरुण धुमाळ, सिद्धार्थ भडकुंबे, मनोज देवकर,सुहास भोसले, राजेश्वर पाटील, आकाश कणकी,सौ.अंजली कणकी नंदकुमार कंगळे,श्रीनिवास बनसोडे, प्रभाकर बनसोडे, आदींनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form