मिर्जागालिब मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

दैनिक_लोकशाही_मतदार
पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली अनेक वर्षा पासून सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी दैनिक तुफान क्रांती वृत्तपत्रा ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे
जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून दैनिक तुफान क्रांती ने सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे वृत्तपत्र केवळ व्यवसाय नसून तो एक वसा आणि चळवळ म्हणून संपादक मिर्जागालिब मुजावर यांनी वृत्तपत्र सुरु केले असून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो व त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही ही भावना मनात ठेवून वंचित पिढीत घटकाच्या विकासासाठी उद्धार करण्यासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भले करण्याची नेहमीच मानसिकता ठेवून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे दैनिक तुफान क्रांती चे संपादक आदरणीय मिर्जागालिब मुजावर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 
शुभेच्छुक - 
यशवंत पवार
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form