एकीकडे उन्हाचा पारा ४४ पार तर दुसरीकडे तासंतास लाईट गुल ; नागरीक तीव्र उकाड्याने हैराण

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - सोलापूर शहर जिल्ह्याने तापमान गेल्या अठवड्या भारपासून ४४ पार केले असून प्रशासन देखील उन्हापासून काळजी घेण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत. उष्माघातामुळे गेल्या काही दिवसात सोलापुरात मृत्यु झाल्याचीही घटना वळसंग येथील शिक्षका संदर्भात घडले आहे. तर दुसरीकडे येवढ्या तळपत्या उन्हात आणि तीव्र उकाड्यात महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचे अजब गजब कारभार दिसून येत आहे हृदयविकाराचे रुग्णांना उकाड्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्यातच महावितरण यांनी तासंतास लाईट घालवल्याने नागरीक फारच कासावीस  होत आहेत आणि महावितरण वाले झोपेचे सोंग घेत आहेत का? येवढ्या उन्हात लाईट घालवल्यावर आम्ही मारायचे का? असे प्रश्न नागरिकांमधून सद्ध्या  उद्भवत  आहेत. तरी याकडे संबंधित यंत्रणा कश्याप्रकारे लक्ष देईल हे देखील महत्त्वाचे असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form