दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या पाचव्यापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंतच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने वेतन निवारण समिती 2024कडे केली आहे.
तसे निवेदन युनियनने विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर यांना युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी दिले आहे. यावेळी सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, खजिनदार राहूल कराडे व उपाध्यक्ष आनंद व्हटकर उपस्थित होते.
समान काम-समान वेतनानुसार शालेय ग्रंथपालाप्रमाणे महाविद्यालयीन सहाय्यक ग्रंथपालाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी. प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपीक व ग्रंथालय लिपीक ही समानवेतनश्रेणीच्या पदाच्या त्रुटी दूर कराव्यात. विद्यापीठाप्रमाणे महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यकास वेतनश्रेणी मिळावी. समान काम-समान वेतनानुसार विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व अधिक्षकप्रमाणे महाविद्यालयातील प्रबंधक व अधिक्षक यांना वेतनश्रेणी मिळावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
Tags
सोलापूर