तीन दिवस तापमान चाळीसच्यावर, मात्र, आजपासून पावसाचा अंदाज

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-मागील तीन दिवसांपासून सोलापूरचे तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्यावर होते. त्यामुळे सोलापूरकर उन्हाने हैराण झाले. आता मात्र सोलापूरकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रविवार २ जूनपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
रविवार २६ मे रोजी तापमान ४०.४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर पाऊस आल्याने तापमान कमी झाले. पुन्हा ३० मे रोजी तापमान ४० च्यावर गेले. तर एक जूनपर्यंत तापमान ४० अंशाच्यावरच होते. आता मात्र, पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २ जून ते ५ जून असे चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत सोलापूरकरांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. मे २०२४ मधील ३१ दिवसांत १७ दिवस तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्यावर राहिले. तर उरलेले १४ दिवस ४० अंशाच्या खाली तापमान राहिले. मे महिना हा सर्वाधिक तापमानाचा मानला जातो. ५ मे रोजी यंदाचे सर्वाधिक ४४.४ अंश तापमान नोंदविले गेले. त्यानंतर अधून-मधून पडणारा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे तापमानात चढ-उतार सुरूच होता. आता पाऊस सलग आल्यास तापमान सतत घट पाहण्यास मिळू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form