दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर | प्रतिनिधी- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ यामध्ये मनुस्मृतीमधील श्लोक पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न चालु असले बाबत प्रसार माध्यमाद्वारे समजले आहे. तरी मनुस्मृतीच्या आशयाचा पुन्हा जर का पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात आला तर भारतीय लोकशाहीला बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि माणूस माणसापासून विचलत होवून ते विसंतीच्या मागे धावेल आणि मनुस्मृती या आहारी गुरफटला जाईल त्यामुळे मनुस्मृतीमधील श्लोकचा समाविष्ट होवू नये. तरी शालेय विद्यार्थ्यांना चांगले वैचारिक ज्ञान देवून प्रगतीपथावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने वाटचाल व्हावी अशी अपेक्षा आहे.जर का प्रशासनाने जनतेच्या भावनेची कदर न करता मनुस्मृतीच्या श्लोकचा पाठ्यपस्तकात जाणुन बुजुन समावेश केल्यास लोकहीतार्थ जनहितार्थ भारतीय बौध्द महासभा सोलापूर जिल्हा व शहर शाखेच्या बनीन प्रशासनाच्या तीव्र निषेध करुन जन आंदोलन छेडले जाईल व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने दखल घेटण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा राजश्री गायकवाड कमलाकर कांबळे संजय वाघमारे सुरेखा कांबळे प्रज्ञा आबुटे करुण पात्रे विजयकुमार आबुटे रवींद्र कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
