दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर /प्रतिनिधी - सोलापुरात गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झालेलं दिसून आलं. सोलापुरातील जिल्हापरिषद येथे असणारे अंदोलनगेट म्हणजेच पूनमगेट येथे बुधवारी रात्री पासून पावसामुळे झाड पडलेले आहे. तेथे आंदोलनकर्ते असतात त्यांच्या जीवास धोका नाकारता येत नाही. गुरुवार म्हणजे आज सकाळपासून प्रशासनातील कोणीच कर्मचारी अधिकारी यांचे या झाडाकडे लक्ष गेले नाही का? पूनमगेटला कोणी वाली नाही का? असे प्रश्न सद्ध्या स्थानिक नागरिकांना भेडसावत आहेत.
Tags
सोलापूर
