दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत, विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुलांना सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने शाळेत भेट घेऊन वह्या वाटपच्या कार्यक्रमात गेल्या वर्षीच दहावीत ८५% टक्क्यापेक्षा जास्त घेतलेले प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक गुण घेणा-या विद्यार्थांना सन २०२४ च्या वही वाटप कार्यक्रमात बक्षिस देवून सन्मानित करण्यात येईल,असे आवाहन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले होते.
तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा भेट दरम्यान आवाहन केलेल्या शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षकांनी आपली महत्वपूर्ण भूमिकेतून आपल्या शाळेतील दहावीत ८५% टक्क्या पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विद्यार्थांची नावे खालील नंबरवर संपर्क साधून नोंदविण्याचे आवाहन फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क
महांतेश बगले - 9923066282
वैभव वाकडे - 9834767602
अनिकेत फताटे - 7775049797
मल्लिनाथ भरमशेट्टी 9403877972
Tags
सोलापूर