दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर /प्रतिनिधी #अक्षय बबलाद- शासन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध शासकीय योजना जाहीर करून उपाययोजना करत आहे परंतु खरोखर महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला व मुलींचे बाबतीत होणाऱ्या विनयभंग छेडछाड व गंभीर गुन्हेचे प्रमाण कमी करून महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी सुरुवातीपासूनच शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाचे धड्यांचा समावेश केला तर मुलींचा आत्मविश्वास वाढून अशा पद्धतीच्या घटना व गुन्हे यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होऊन महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्हाांची संख्या घटेल संघटनेने यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने प्रायोगिक तत्वावर एक महिन्याचे काही दिवसांचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयात देऊन चाचणी केली आहे परंतु शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तकात सदरचा अभ्यासक्रमाची सक्ती केल्यास निश्चितपणाने याचा फायदा सर्वच मुलींना होईल त्यामुळे आपण शासन स्तरावर निर्णय घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक
मजबूत वाटचाल करावी अश्या आशयाचे निवेदन गुरुवारी सोलापूर जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेने दिले असल्याचे युवती अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले दरम्यान जिल्हापरिषद पूनम गेट येथे विविध स्लोगन चे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक निंबाळकर महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला झोंबडे सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

