सोलापुरात काहीच अशक्य नाही ! कारण..आधुनिक यंत्राने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी लेप्रोस्कोपी सिस्टीम च्या साहाय्याने डॉ संजीव ठाकूर यांचा प्रयत्न यशस्वी

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी )- महाराष्ट्र मधील कठीण आणि गुंतागुंती ची अशी पहिली शस्त्रक्रिया श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी यशस्वी केली असून लॅप्रोस्कोपी सिस्टीम अत्याधुनिक यंत्राचा प्रथमच वापर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एका रुगाच्या गुद्द्वारामध्ये गुंतागुंत झाल्याने ती शस्त्रक्रिया करणे कठीण काम होते. कमीत कमी चिरफाड करून ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, मात्र कमीत कमी चिरफाडमध्ये ते शक्य नव्हते. अशा परिस्थितीत अत्याधुनिक

लॅप्रोस्कोपी सिस्टीम वापरून हो शस्त्रक्रिया करण्यात व रुग्णाला जीवदान देण्यात डॉ. संजीव ठाकूर यांना यश आले आहे. डॉ. संजीव ठाकूर हे डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत. त्याशिवाय डॉ. संजीव ठाकूर हे देशातील नामांकित शस्त्रक्रिया विशारद आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या अत्याधुनिक साधनाची निर्मिती करणाऱ्या एका अमेरिकेतील कंपनीने कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना अधिकची चिरफाड न करता सुलभ झाली पाहिजे. याकरिता १७८८ फोर के कैमेरा लॅप्रोस्कोपी सिस्टीम नावाचे अत्याधुनिक यंत्र तयार केले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती अडचण येते?त्या यंत्राची उपयोगिता ही सरळ आणी सोपी आहे का? याच्या परीक्षणासाठी डॉ संजीव ठाकूर यांची निवड करण्यात आली अशी माहिती डॉ विशाल गुरव यांनी दिली.

मुंबई पुणे आणी हैद्राबाद येथील मोठया रुग्णालयात ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते, त्याच पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले 

या नव्या तंत्रज्ञानामुळे पित्ताशयाची पिशवी  काढणे, स्वादुपिंडातील खडे काढणे, हर्निया,

बेरेंटिक सर्जरी, हिस्टोरी, पोटातले वेगवेगळे विकार

तपासणे आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणे. याशिवाय छातीचा कॅन्सर, पोटातील विकार. आतड्याचे रोग आदीवर तत्काळ उपाय करणे सोपे जाणार आहे भारतात पहिलाच प्रयोग आम्ही सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून घेतला आहे अधिकाधिक रूग्णानी याचा लाभ घ्यावा या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात.

-डॉ. संजीव ठाकूर,

अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय.सोलापूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form