महापालिका मध्ये सक्षम अधिकारी नसल्याने शहरात अतिक्रमणात कमालीची वाढ

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरात वर्षानुवर्षे होत असलेली अतिक्रमणे पाहता अनेक ठिकाणी रस्ता अरुंद होत चालला असून शहरात 

 भाजी विक्रेते फळे विक्रेते चायनीज वडापाव दाल चावल  फेरीवाल्या गाड्या पानटपऱ्या चहा च्या कॅन्टीन मुळे रस्त्यावरच उभारणाऱ्या गाड्या अश्या विविध प्रकारचे अतिक्रमण सोलापूर शहर स्मार्ट सिटी मध्ये होताना दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासून महापालिका मधील अतिक्रमण विभागाचे सक्षम अधिकारी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती यादरम्यान रस्त्यांनी आणि सोलापूरकरांनी अतिक्रमणापासून सुटकेचा निःश्वास सोडला होता परंतु बनसोडे हे सेवानिवृत्त झाल्या पासून शहरात पुन्हा अतिक्रमण ने कमालीची डोके वर काढताना दिसत आहे नेहमीच कुचकामी ठरणारा महापालिका(अतिक्रमण विभाग) प्रशासन बनसोडे यांच्यामुळे  शहरातील अतिक्रमण हटविण्यापासून थोडासा यशस्वी झाल्याचे दिसून आले.  महापालिका अतिक्रमण विभाग चे अधिकारी बनसोडे हे निवृत्त झाले असल्याने शहरात अतिक्रमण पुन्हा वाढले आहे महापालिका वतीने बनसोडे यांच्या जागी तात्पुरता अतिक्रमण विभागास अधिकारी दिला आहे मात्र आता पुन्हा बनसोडे यांच्या सारखा सक्षम व  निर्भिड अधिकारी सोलापूरला मिळणार का? असा प्रश्न सोलापूरकरांना सध्या भेडसावत आहेत. शहरात जागो जागी अतिक्रमण मुळे वाहतुकीचा देखील बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे  सोलापूर  महापालिका अतिक्रमण विभागाला सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुजाण नागरिक करत आहेत.

सोलापूर शहरातील अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असून या अतिक्रमण ला राजकीय आश्रय असल्याने अतिक्रमण काढण्यात फार मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोललं जात आहे स्मार्ट सिटी च्या नावासमोर आता अतिक्रमण होत असल्याने  सोलापूर ओळख आता अतिक्रमण शहर म्हणून होऊ लागली आहे. सोलापूर महापालिका ने शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी बनसोडे सारखा धडाकेबाज अधिकारी नेमावा अशी मागणी देखील जोर धरू लागली असून जेणेकरून अतिक्रमण करणाऱ्यांचे मुसक्या आवळल्या जातील आणि रस्त्यांसोबत सोलापूरकर देखील अतिक्रमण पासून सुटकेचा निःश्वास सोडतील.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form