ट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू ; गांधीनगर येथील घटना

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- गांधीनगर अक्कलकोट रोड येथे पाई चालत जात असताना ट्रकने धडक दिल्याने एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
 याबाबत अधिक माहिती अशी की, आज दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील कमला को-ऑपरेटिव बँक कॉर्नर जवळ पाई चालत जात असलेल्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ट्रक क्रमांक MH13CU5577 ने जोराची धडक दिली.
रमेश कोटया श्रीमल वय वर्ष 65 राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
 त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी बालमणी श्रीमल सून यांनी दाखल केली असता उपचारापूर्वी झाल्याचे समजले.
 सदर या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत झाली आहे.
  पायी चालत जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळेया परिसरात एकच खळबळ उडाली होती. 
रमेश कोटया श्रीमल हे गांधीनगर येथील एका टेक्स्टाईल कारखान्यात कामाला होते.
 त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form