दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-यातील फिर्यादी याच्यासोबत आरोपीची मुलगी पळून जाऊन लग्न केल्याचं राग मनात धरून गच्ची पकडून हाताने मारहाण करून तुझा सैराट करतो तुला जीव मारून टाकतो असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
यात नमूद घटना अशी की फिर्यादी व आरोपीच्या मुलीचे प्रेम संबंध होते अशातच फिर्यादी व आरोपीची मुलगी यांनी पळून जाऊन प्रेम विवाह केलेला होता. त्याचाच राग मनात धरून दि.17- 06-2023 रोजी फिर्यादी हे रिलायन्स सुपर मार्केट आसरा होडगी रोड सोलापूर येथे काम करीत असताना दुपारी दोन च्या सुमारास आरोपी नामे शहनाज मेहबूब शेख, महीबूब गुलाब शेख, साहेब महबूब शेख, वसीम शौकत शेख व शाहिद वाहि
द शेख हे फिर्यादी काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची गच्ची पकडून तू बाहेर चल तुला बोलायचे आहे,चल तुझा सैराट करतो,तुझा जीव मारून टाकतो,तुझी लायकी आहे का माझ्या मुली सोबत लग्न करण्याची असे म्हणून फिर्यादीचा अपमान केल्याप्रकरणी फिर्यादी यांनी वरील आरोपी यांच्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 143,147,323,504,506 व अ. जा.अ.ज.(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 चे कलम 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
वरील प्रकरणांमध्ये आरोपीवर चार्ज होऊन सुनावणी करण्यात आली. सरकार पक्ष आरोपीवर लावलेला आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी आरोपींची 25 हजार रुपयांच्या जामीनावर निर्दोष मुक्तता केली.
यात सर्व आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य, ॲड अजिंक्य शाक्य, ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले
