दसरा मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून लाखो मराठे जाणार नारायण गडावर

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर(प्रतिनिधी)- सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून दसरा मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव निघणार असून त्याबद्दलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील, गाव वाड्या, आणि वस्त्यांवर जावून मराठासेवक मराठा समाजाला नारायण गड येथे जाण्याविषयी सांगण्यासाठी बैठका घेत आहेत. प्रत्येक तालुका मराठासेवक त्या त्या तालुक्यातील गावा गावात जावून संपर्क करून प्रत्येक गावातून ४ ते ५ गाड्या नारायणगडसाठी काढल्या पाहिजेत असे समाज बांधवांना सांगत आहेत. जवळ जवळ प्रत्येक गावातून ५ गाड्या जरी धरले तरी एका तालुक्यातून ५०० गाड्या आणि जिल्ह्यातून ५००० गाड्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गड येथे आण्यासाठी तयार आहेत. तसेच टू व्हीलर आणि स्वतःच्या फोर व्हिलर मधून हजारो बांधव मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून निघणार असून त्याबद्दलची तयारी अंतिम टप्यात आली आहे.मराठा समाज हा माढा, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला आणि उत्तर सोलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.शासनाच्या दुटप्पी भूमिके मुळे मराठा समाज सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर नाराज असून त्याबद्दलची अंतिम भूमिका मनोज दादा जरांगे पाटील दसरा मेळाव्यात घेणार आहेत, मराठा आरक्षणाचा लढा आत्ता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक समाज बांधव हे जाणून असल्यामुळे मराठे मनोज दादा काय निर्णय घेणार हे ऐकण्यासाठी आणि समाज दादांच्या मागे खंबीरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून लाखो मराठा समाजाचे लोक नारायण गड येथे जाणार आहेत.मराठ्यांना आरक्षण दिलं नाही ते नाही उलट मराठ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासाठी सरकार नवीन १५ जातींचा समावेश ओबीसी मध्ये करत आहे ही बातमी काल वृत्तवाहिन्यांवर आल्या पासून मराठा आणखीनच चिडला असून या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा पत्रकार परिषदे दरम्यान माऊली पवार यांनी दिले आहे याप्रसंगी राजन जाधव सचिन टिकते गणेश देशमुख आदी सखल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा मराठा बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form