दक्षिण विधानसभा लढविणारच! रजाक मुजावर यांचा दृढ निश्चय तर मतदार संघावर प्रबळ दावेदारी

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरात दक्षिण तालुका मतदार संघात विधानसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत काही उमेदवार दक्षिण विधानसभेची सीट ही आमचीच म्हणत प्रबळ दावेदारी करत असल्याचे दिसून येते नई जिंदगी भागातील रहिवासी समाजसेवक ज्यांनी आजवर अनेक गोरगरिबांच्या अडी अडचणीत धावून गेले असे रजाक मुजावर हे देखील आपली दक्षिण विधानसभा मतदार संघावर प्रबळ दावेदारी दर्शवत आहेत सुरवातीला काँग्रेस पक्षातून त्यांनी उमेदवारी साठी अधिकृत फॉर्म देखील भरला आहे परंतु सध्याचे काँग्रेस पक्षातील संभाव्य उमेदवारांची चर्चा पाहता आपल्याला काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळेल की नाही याची शास्वती नसल्याने मुजावर यांनी त्यांच्या मतदार संघातील नागरिक , कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पक्षासह अथवा पक्षाविना निवडणूक लढविणारच असे ठाम निर्णय घेतल्याचे सांगितले आहे येणाऱ्या काळात दक्षिण मतदार संघामध्ये कोण सरशी ठरेल हे पाहणं देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

जनतेच्या व दक्षिण तालुक्याच्या विकासासाठी विधानसभा लढविणारच - राजाक मुजावर

सोलापुरात गेले अनेक वर्षानुवर्षे तेच ते आमदार निवडून येत असून मतदार संघातील विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडले आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक अनेक समस्यांनी व विविध प्रश्नांनी भेडसावत असून शेतकरी देखील मोठ्या संकटात आहे आजी माजी आमदारांनी काही काम केले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात दौऱ्या दरम्यान जनतेची संवाद साधताना त्यांच्या समस्यांवर चर्चा करताना अनेक प्रश्न मतदार संघात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले त्यामुळेच कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहू नये सर्व सुख सुविधा सर्व समस्या नागरिकांच्या सुटव्यात आणि दक्षिण तालुका प्रगतशील शेतींनी सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी माझ्या कार्यकर्त्यांच्या तसेच मतदार संघातील जनतेच्या आग्रहाखातर पक्षासह अथवा पक्षाविना निवडणूक लढवणारच असल्याचे ठाम निर्णय घेतले असल्याचे रजाक मुजावर यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले आहे.आणी येणार काळ तसेच मतदार राजावर माझा विश्वास आहे ते नक्कीच मला आणि दक्षिण तालुक्याच्या विकासासाठी न्याय व साथ देतील असा विश्वास देखील मुजावर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form