दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) - दक्षिण सोलापुरात मोठे समाजिक कार्य असणारे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे हे काँग्रेस पक्षातून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून लढविण्यास इच्छुक होते तसे त्यांनी काँग्रेस पक्षाचे फॉर्म देखील भरले होते परंतु काँग्रेस पक्षात त्यांच्या उमेदवारी बद्दल काहीसा अलबेल दिसून येत असल्याने गेल्या ३ दिवसांपूर्वीच महादेव कोगनुरे हे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दक्षिण मधून निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम झाल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन आपल्या उमेदवारी बद्दल चर्चा करून दक्षिण मध्ये ठासून आज उमेदवारी आणली आहे. महादेव यांना उमेदवारी मिळताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. कोगनुरे हेच आता दक्षिणचे आमदार होणार अशी चर्चा,भावना दक्षिण तालुक्या मधील जनतेतून तथा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोगनुरे यांना मनसे कडून उमेदवारी जाहीर झाल्याने दक्षिण मध्ये अनेकांची गोची मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि लढतही मोठी होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. येणारा काळ कोणाला सरशी करेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
