दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर ( प्रतिनिधी)- नई जिंदगी येथील महालक्ष्मी नगर 67 पेठ येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मानव अधिकार संघटना वतीने प्रशासनाला अनेक वेळा निवेदन सादर करण्यात आले होते महालक्ष्मी नगर येथील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रशासन वेळेत सोडवला नसल्याने अखेर मानवाधिकार संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली पाच दिवसापासून मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. मानवाधिकार संघटनेच्या सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन स्थळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे दाखल होऊन नई जिंदगी महालक्ष्मी नगर येथील नागरिकांचा पाणी पिण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून महानगरपालिकेला नियमित कर भरून देखील या भागातील नागरिकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना सदर धरणे आंदोलनाची दूरध्वनीवरून माहिती दिली मानवाधिकार संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाची महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी तात्काळ दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्याबरोबर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख चौबे विभागीय अधिकारी जगधने व सरकाझी यांच्याबरोबर बैठक लावून मानवाधिकार संघटनेच्या बेमुदत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची माहिती घेतली नई जिंदगी भागातील महालक्ष्मी नगर येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असल्याने तात्काळ महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवाधिकार संघटनेच्या धरणे आंदोलन स्थळी पाठवून नई जिंदगी भागातील महालक्ष्मी नगर येथील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आदेश दिले होते. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी ने जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुरू असलेल्या मानवाधिकार संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलन स्थळी उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांच्याबरोबर चर्चा करून महालक्ष्मी नगर येथील पाईपलाईन च्या बाबतीत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पत्र व्यवहार केला असून निधी उपलब्ध होताच महालक्ष्मी नगर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितले तोपर्यंत महालक्ष्मी नगर मधील नागरिकांच्या सोयीसाठी दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवून त्या भागातील नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल असे ठोस आश्वासन दिले
महानगरपालिकेच्या बडे अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मानव अधिकार संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांनी दिली.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ( सामाजिक संरक्षण विभाग) प्रवीण चांदेकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष(आरोग्य विभाग ) अकबर शेख सलीम शेख उमर शेख मीर मोहम्मद खान मौलाना हाफिज अफसर सलीम शेख दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रोहित लालसरे उपस्थित होते.
Tags
सोलापूर