दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-मंगळवार दुपारपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ४८ तासात राजकीय नेत्यांचे पोस्टर्स, सरकारी योजनांचे बॅनर्स हटविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात १२ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिलीश.हर मध्य विधानसभा मतदारसंघातील तयारी बाबत निवडणूक अधिकारी पडदूणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी तहसीलदार नीलेश पाटील, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते.आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी राजकीय कार्यालय, खासगी जागा आणि शासकीय परिसरात असलेले राजकीय पोस्टर्स ४८ तासात काढून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. या मतदारसंघात १२ फ्लाईंग स्कॉड फिरतीवर राहतील. कुठे काही घडल्यास शंभर मिनिटांच्या आत कारवाई होईल.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी काही संभाव्य उमेदवार वाढदिवस, मेळावे साजरे करण्याचे कार्यक्रम घेतात, त्यावर वॉच राहणार आहे. मतदारसंघात चार चार ठिकाणी चेक पोस्ट तैनात केली आहे. तपासणी पथकाकडून चोवीस तास वाहने तपासतील, तिथे अधिकारी, पोलिस कर्मचारी असतील.
सभेची परवानगी आवश्यक
सभेच्या परवानगीसाठी उमेदवार सुविधा या अॅपमध्ये परवानगी अर्ज करता येईल. या मतदारसंघात जास्त सभेची ठिकाणे असल्याने व्हिडीओद्वारे वॉच ठेवले जाणार आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये असून खर्च तपासणीसाठी अर्थ विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर ते तीन वेळेस जाहीर केले पाहिजे. ते प्रसिध्दीकरण चार दिवसांच्या फरकाने करावा. प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत प्रसिद्ध केले पाहिजे, हे बंधनकारक आहे, अशी माहिती पडदुणे यांनी दिली.
