सोलापूर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय जनमंच पक्ष मैदानात प्रदेश उपाध्यक्ष डॉ पराग येदूर


 दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील शहर उत्तर व शहर मध्येसाठी राष्ट्रीय जनमत पक्षाच्यावतीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पेशाने आणि कम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवा व सुशिक्षित उमेदवार म्हणून मनीष कोमटी या युवकाला संधी देण्यात आले असून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय सेवानिवृत्त व अभ्यासू कर्मचारी राजू शिंदे यांना राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने उमेदवारी दिल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पराग येदूर यांनी दिली असून सोलापूर शहर उत्तर व शहर मध्य मध्ये पाणी कचरा ड्रेनेज लाईन बेरोजगारी कारखानदारी त्याचबरोबर टेक्स्टाईल हब व सोलापुरात अनेक युवक विविध डिग्री घेऊन सोलापूर शहर सोडून पुणे मुंबई हैदराबाद चेन्नई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत त्यामुळे सोलापूर शहराचा विकास खुंटला असून सोलापूर शहरातील विद्यमान आमदारांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी काहीच उपाययोजना न केल्याने शहरातील उच्चशिक्षित युवकांना सोलापूर शहर सोडावी लागत आहे उजनी धरणाचा पाणीसाठा पुरेसा उपलब्ध असताना देखील सोलापूर शहराला चार दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना असताना देखील विद्यमान आमदारांनी सोलापूर शहराचा विकास केलेला नाही सोलापूर शहराचा विकास त्याचबरोबर सोलापूर शहराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सोलापूर शहर उत्तर मधून राजू शिंदे तर सोलापूर शहर मध्य मधून मनीष कोमटी यांना राष्ट्रीय जनमंच पक्षाकडून उमेदवारी दिली असून कॅम्पुटर या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पराग येदूर यांनी केले आहे. यावेळी दैनिक अब तक संपादक तथा जनक्रांती पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप राष्ट्रीय जनमत पक्षाचे विष्णू सामल उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form