दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रत्येक उमेदवार हा जनतेमध्ये आपला ठसा निर्माण करून वेगवेगळी आश्वासने देऊन माझाच कसा विजय निश्चित होईल याचे तळमळीने प्रयत्न करत असताना दिसून येत आहे. सोलापुरात नेहमीच शहर मध्य मतदारसंघ चर्चेचा विषय बनलेला असतो इतकेच काय तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सोलापूर शहर मध्य मतदार संघावर टिकून असतो मात्र यंदाच्या बारिला सोलापुरात वेगळेच चित्र दिसून येत आहे सोलापूर शहर मध्य पेक्षा दक्षिण मतदार संघात मोठी चढाओढ आणि चुरस दिसून येत आहे. उमेदवार पक्ष अपक्ष आणि मोठ्या पक्षांनी देखील उलट्या सोंगट्या टाकत ऐनवेळी उमेदवारस माघार घेण्यास भाग पाडले त्यामुळे आता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपा कडून सगल दोन टर्म आमदार असलेले सुभाष देशमुख अपक्ष ज्यांनी नुकतेच राजकारणात आपली दक्षिण मध्ये प्रबळ दावेदारी दाखवत अपक्ष उमेदवारी भरले असे उमेदवार धर्मराज काडादी तर मनसेचे अधिकृत उमेदवार ज्यांनी आजपर्यंत एक के फाऊंडेशनच्या मद्यामतून अनेक विविध सामाजिक काम करत आले आहेत असे महादेव कोगनुरे अशी तिरंगी लढत होणार असून सुभाष देशमुख हे आपली हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरणार की अन्य कोण बाजी मरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
