प्रजाहीत यट्युब चे अकिब नाईकवाडी व इब्राहिम जमादार विरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल कारवाई न केल्यास सहकुटुंब उपोषणास बसण्याचा इशारा

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- शहरातील  श्रीकांत गायकवाड यांच्या पूनम ऑनलाईन सेंटर वर दिनांक 20/12/2024 रोजी प्रजाहीत युट्युबचे चे दोन ओळख पत्र घातलेले ईसम पूनम ऑनलाइन सेंटर येथे चालक श्रीकांत गायकवाड  यांना त्यांच्या पूनम ऑनलाईन सेंटर येथे जाऊन विविध प्रश्न विचारून आपल्या मोबाईलच्या  कॅमेरा मध्ये  ऑनलाईन सेंटर मध्ये बसलेल्या चालक श्रीकांत गायकवाड यांचे चित्रीकरण करण्यात आले  त्यानंतर  प्रजाहीत  न्यूज 24 युट्युब च्या दोन ओळखपत्र धारकानी तुम्ही ऑनलाईन चे काम करता  लोकांकडून जादा पैसे घेता  तुमच्या विरोधात बातमी लावतो असे जोरात धमकी वजा बोलून निघून गेले असल्याचा आरोप चालक श्रीकांत गायकवाड यांनी केला असून त्यानंतर दिनांक 22/12/2024 रोजी प्रजाहीत  24 न्यूज या युट्युब वरून ऑनलाईन चालक श्रीकांत गायकवाड  यांना ऑनलाइन सेंटर बाबत बातमी लावल्याची  माहिती श्रीकांत  गायकवाड यांना त्यांच्या मित्राकडून समजली व त्या मित्राने ती बातमी ऑनलाईन चालक श्रीकांत गायकवाड यांना पाठवली सदरची बातमी पाहून  मला खूप मोठा धक्का बसलेला आहे  मी एक सामाजिक कार्यकर्ता असून गेल्या वीस वर्षापासून  गोरगरीब वंचित पीडित  लोकांसाठी असलेल्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी  मी नेहमीच प्रयत्न करत असून  सदर युट्युब वरून  आलेल्या बातमीने माझे सामाजिक मानसिक नुकसान झालेले असून  मला समाजामध्ये बदनाम करण्याच्या हेतूने  सदरची बातमी जाणीवपूर्वक  प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत श्रीकांत गायकवाड यांनी केला असून  सदर प्रजाहित युट्युब च्या बातमीमध्ये अखिल भारतीय जनजागृती संघटना चे  प्रदेश अध्यक्ष इब्राहिम जमादार यांनी पूनम ऑनलाईन सेंटर संदर्भात बिन बुडाचे व खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे  अशी लेखी तक्रार पूनम ऑनलाईन सेंटर चे चालक श्रीकांत गायकवाड यांनी सोलापूर चे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असून या प्रकरणी सखोल चौकशी चौकशी करून प्रजाहित  न्यूज 24, युट्युब चे संपादक  अकिब नाईकवाडी व अखिल भारतीय जनजागृती संघटणचे प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सहकुटंब जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form